भाजपला नको सेनेची साथ

sena
मुंबई – शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला राज्यात सत्ता स्थापनासेठी पाठींबा देण्यास तयारी दर्शवली असली तरी भाजप वेगळ्याच विचारात आहे. पक्ष स्वबळावर आणि अपक्षांच्या सहकार्याने भाजप सत्ता स्थापन करणार आहे.

शिवसेना भाजपला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी साथ देणार असली तरी शिवसेना सदस्यांची पाठिंब्याची यादी येईपर्यंत राज्यपालांना भाजप २८ ऑक्टोबरला १३८ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करणार आहे.

यात काही अपक्ष आमदारांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वधिक जागा जिंकल्या असल्या तरी बहुमत नसल्यामुळे भाजपला सत्ता स्थपानेसाठी साथदाराची गरज आहे. विधानसभा निवडणुकीआधी जागावाटपाच्या चर्चेपासूनच भाजपने शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केली. यानंतर आता भाजपने पुन्हा एकदा सेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.