
पुणे – लाखो रुपयांचे सोने पुणे विमानतळावरुन पोलिसांनी जप्त केले असून पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटकही केली आहे.
लाखोंचे सोने विमानतळावर जप्त
याबाबत सविस्तर वृत्त असे की २ किलोंहून अधिक सोने पुणे विमानतळावर जप्त करण्यात आले असून या जप्त केलेल्या सोन्याची बाजार भावानुसार किंमत जवळपास ५८ लाख ७१ हजार रुपये आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मोहद्दीन शेख याला अटक केली आहे. हे जप्त केलेले सोने दुबईहून आणले असल्याची शक्यता असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
