
मुंबई – भाजप राज्यात शिवसेनेच्या मदतीने सरकार स्थापन करणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले असून या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे.
नविन सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर
वानखेडे स्टेडीयमची या शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी पाहणी करण्यात आली. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही पाहणी केली आहे. यापूर्वी बीकेसी मैदानावर राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, अशी चर्चा होती. पण, वानखेडे स्टेडियमला प्राधान्य देण्यात आले आहे.
