महाराष्ट्राचे १६५ नवनिर्वाचित आमदार आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

mla
मुंबई – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडुन आलेल्या तब्बल १६५ आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

नवनिर्वाचित २८८ आमदारांपैकी तब्बल १६५ जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यातील ११५ जणांवर हत्या, खुनाचा प्रयत्न, खंडणी व दरोडा तसेच अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

ही माहिती असोसिएशन फॉर डेमॉक्रेटीक रिफॉर्म्स या संस्थेने सादर केलेल्या अहवालात उघड झाली असून संस्थेने नवनिर्वाचित २८८ आमदारांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करून हा अहवाल सादर केला आहे.

यंदा निवडून आलेल्या आमदारांमध्ये २००९च्या तुलनेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांचा टक्का वाढल्याचे ‘एडीआर’च्या अहवालात म्हटले असून मागच्यावेळेच्या तुलनेत यंदा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आमदारांचा टक्का ५२ वरून ५७ झाला आहे.

३३ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद असणाऱ्यांची संख्या पोहोचली आहे. भाजपाच्या १२२पैकी ४६ आमदारांवर विविध प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. तर, शिवसेनेच्या ६३ पैकी ३५ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. टक्केवारीच्या दृष्टीने शिवसेनेत सर्वाधिक ५६ टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीचे ४४ टक्के तर काँग्रेसच्या २४ टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.

Leave a Comment