संपूर्ण जगात खळबळ उडवून देणा-या लेविंस्की टि्वटरवर

monica
वॉशिंग्टन – १९९८ च्या दरम्यान अमेरिकेसह संपूर्ण जगात खळबळ उडवून देणा-या मोनिका लेविंस्कीने सोशल नेटवर्कींग साईट टि्वटरवर पदार्पण केले आहे.

व्हाईट हाऊसमधील राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासोबतच्या प्रेम प्रकरणामुळे मोनिका संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. १९९५ मध्ये व्हाईट हाऊसमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या मोनिकाचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याबरोबर सूर जुळले. व्हाईट हाऊसमध्ये असताना क्लिंटन यांचे दोन वर्ष मोनिकासोबत प्रेमसंबंध होते. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर क्लिंटन यांना महाभियोगालाही सामोरे जावे लागले होते.

आपल्या टि्वटर खात्यावर मोनिकाने स्वत:ला समाजसेविका दाखवले आहे. मोनिका टि्वटरवर दाखल होताच तिला १२,१०० पेक्षा जास्त पाठिराखे मिळाले असून, त्यांनी मोनिकाला शूर, धाडसी, प्रामाणिक म्हटले आहे.