या दिग्गज मंत्र्यांचा झाला दारूण पराभव

result
नारायण राणे- कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक यांनी माजी मंत्री राणेंचा सुमारे 10 हजार मतांनी पराभव करीत जोरदार धक्का दिला.

हर्षवर्धन पाटील- इंदापूर मतदारसंघाचे मागील 20 वर्षापासून प्रतिनिधित्व करतानाच मंत्रीही राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणेंनी सुमारे 22 हजार मतांनी पराभव केला.

मुंबईतील राष्ट्रवादीचे माजी मंत्री सचिन आहिर यांचा वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी दारूण पराभव केला.

जळगाव ग्रामीण मतदारसंघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी पराभव केला.

काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांचा त्यांचे पुतणे व भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांनी पराभव केला.

काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा दक्षिण कोल्हापूरमधून भाजपच्या अमल महाडिक यांनी 9 हजारांनी पराभव केला.

काँग्रेसचे माजी मंत्री व भाजपकडून निवडणूक लढविलेले संजय देवतळेंचा पराभव झाला आहे.

औरंगाबादमधील काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांचा एमआयएमच्या उमेदवारांने दारूण पराभव केला.

विधानपरिषदेचे माजी अध्यक्ष वसंत पुरके यांचा राळेगावमधून दारूण पराभव झाला.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांचा भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांनी आष्टी मतदारसंघातून पराभूत केले.

माजी मंत्री व माजलगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला.

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे बडे प्रस्थ व गेली २० वर्षे मंत्री राहिलेले गणेश नाईक यांचा त्यांच्या बहिण व भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी १ हजार मतांनी पराभूत करीत विजयश्री खेचून आणली.