पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अकोल्यातील शिवसेना उमेदवाराला अटक

shivsena
अकोला – शनिवारी पोलिसांनी अकोला पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव गावंडे यांना पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले गुलाबराव गावंडे हिवरा आश्रमात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस दलात २० टक्के पोलीस हे निगराणी बदमाश आहेत. ते सकाळी पोलीस पोषाखात असतात व रात्री दरोडे घालतात, असा घणाघाती आरोप गावंडे यांनी विधानसभा प्रचारादरम्यान केला होता.