मुंबई-नागपुर दरम्यान दिवाळीनिमित्त दोन विशेष गाड्या

railway1
मुंबई – दिवाळीसणात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी थांबवता यावी म्हणून रेल्वे प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई ते नागपुर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवल्या जातील. बुधवारी २२ ऑक्टोबर रोजी विशेष गाडी क्रमांक ०१०११ सीएसटी मुंबई पासून रात्री १२.२० मिनीटांनी सुटणार असून त्याच दिवशी मध्यरात्री ३ वाजता नागपुरला पोहोचणार आहे. अशाच प्रकारे २६ ऑक्टोबर रोजी विशेष गाडी क्र ०१०१२ नागपूर येथून रात्री ११.५० वाजता सुटणार आहे आणि मध्यरात्री २.४५ वाजेपर्यंत सीएसटीला पोहोचणार आहे. प्रवासादरम्यान ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बंडेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा या स्थानकांवर थांबेल.

Leave a Comment