इबोलावर उपाययोजना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडे निधी अपुरा

uno
संयुक्त राष्ट्र – इबोला रोगाचा जोरात प्रादुर्भाव होत आहे. परंतू त्या रोगावर उपाययोजना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडे पुरेसा निधी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत यासाठी जमा केलेल्या निधीत एक लाख डॉलर प्राप्त झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात ‍एक अब्ज डॉलरची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बान की मून यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून एक अब्ज डॉलर देण्याची मागणी केली आहे. जेणेकरून या रोगाचा सामना करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. १ डिसेंबरपर्यंत इबोलाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र प्रमुखांच्या मते रोगावर नियंत्रण आणण्यासाठी विविध देशांनी दोन अब्ज डॉलर देण्याचे वचन दिले आहे. परंतू आतापर्यंत आमच्या बॅंक खात्यात एक लाख डॉलर उपलब्ध झाले आहेत आणि ते देखील कोलंबियाकडून प्राप्त झाले आहेत. ही फारच गंभीर स्थिती आहे.

राष्ट्रपती बराक ओबामा यांनी म्हटले आहे की, इबोला रोगाला रोखण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांच्या नियुक्तीबाबत विचार सुरू आहे. हे अधिकारी इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांशी संपर्क ठेवतील. पश्चिम आफ्रिकी देशांच्या प्रवासावर प्रतिबंध लावण्याची शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले की, अशा प्रकारे अधिकारी असल्यास आम्हाला नियोजन करण्यास सोपे जाईल.

Leave a Comment