बगदादमधील कार बॉम्ब हल्ल्यात ५० ठार

bagdad
बगदाद – बगदादमध्ये शिया समुदायाला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी कार बॉम्ब हल्ले घडवून आणले आहे. यामध्ये ५० जण ठार झाले असून जखमींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एका स्थानिक पोलीस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आत्मघाती कार बॉम्ब हल्ले इस्लामिक स्टेट संघटनेच्या दहशतवाद्यांनी घडवून आणले आहे. उत्तर दोलाईच्या प्रमुख कंपन्यां असलेल्या परिसरात दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला करण्यात आला. यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. तर अन्य ३४ जण जखमी झाले. दुस-या एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार तलिबिया परिसरात एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटक पदार्थाने भरलेली कार पोलीस स्थानकात घुसवली आणि स्फोट घडवून आणला. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की, मृतांमध्ये सात पोलीस कर्मचारी आणि पाच नागरिकांचा देखील समावेश असून २८ जण गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. उत्तरी हुर्रिया जिल्ह्यातील कार बॉम्ब हल्ल्यात ६ जण ठार झाले. तर अन्य १६ जण जखमी झाले. उत्तर शुला परिसरात बॉम्ब गोळा फेकण्यात आल्याने सहा जण ठार झाले. तसेच १८ जण जखमी झाले. पोलीसांनी सांगितले की, बगदादच्या ३० किमी अंतरावर असलेल्या शिया समुदायाच्या परिसरात पहाटेच्या दरम्यान दहशतवाद्यांनी एक कार बॉम्ब हल्ला घडवून आणला. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले. पोलीसांचा एक ताफा या हल्ल्यात अडकल्याने दोन जण ठार झाले आणि इतर चार जखमी झाले आहेत.