क्रिकेटप्रेमींना खेळाडूंकडून अपेक्षा, मात्र आम्ही देखील माणूस आहोत – विराट कोहली

virat
धर्मशाला – दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यादरम्यान अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे देशातील क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षांवर प्रत्येक वेळी खेळाडूने उतरलेच पाहिजे, अशी लोकांची फार अपेक्षा असते. परंतू आम्ही देखील माणसे आहोत, कोणतेही मशीन नाही हे लोकांना समजले पाहिजे. जर आम्ही एका सामन्यात चांगले प्रदर्शन करू शकलो. तरी दुस-या सामन्यात परिस्थितीत काही बदल असू शकतात, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली याने केले आहे.

कोहली पुढे म्हणाला की, आज वेस्टइंडिज विरोधात होणा-या चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी आम्ही तयार आहोत आणि संघाला दिल्लीत मिळालेल्या विजयाचे श्रृंखला आजच्या सामन्यात देखील कायम राहिल. या सामन्यासाठी मानसिकरित्या आम्ही तयार आहोत. येथील हवामान थंड आहे. परंतू याठिकाणी आम्ही अनेक सामने खेळलो आहोत. येथील मैदान गोलंदाजी आणि फलंदाजी दोघांसाठी अनुकूल आहे. परंतू नाणेफेकीनंतर आम्ही गोलंदाजी करू की फलंदाजी याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. याचा निर्णय आम्ही सामन्याच्या आधी करू, असेही कोहली म्हणाला.

Leave a Comment