दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सुरू

tadoba
चंद्रपूर – पावसाळ्यात अंशत: सुरू असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सर्व दरवाजे पर्यटकांसाठी खुले झाले. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने आलेल्या जोडून सुट्यांमध्ये पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. पावसाळ्यात या प्रकल्पातील केवळ मोहर्ली द्वार सुरू होते. त्यामुळे मोहर्ली ते ताडोबा हा रस्ता पर्यटकांसाठी खुला होता. मात्र उर्वरित पांगडी, झरी, कोलारा, नवेगाव, खुंटवडा हे पाच प्रवेशद्वार बंदच होते. हे सर्व प्रवेशद्वार आता उघडण्यात आले आहेत. प्रवेशद्वार उघडण्याचा निर्णय होताच गुरुवारी सकाळ आणि दुपारच्या सत्रात प्रत्येकी २१ वाहने प्रकल्पात गेली. त्यावेळी पर्यटकांमध्ये असलेला उत्साह पाहण्यासारखा होता. त्यातील दोन वाहनांना व्याघ्रदर्शन झाले. दरम्यान पर्यटकांना रानकुत्रे, चितळ, सांबर, रानगवे बघण्यास मिळाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

Leave a Comment