शिवसेनेच्या उद्योगांना जनताच उत्तर देईल – देवेंद्र फडणवीस

devendra
नागपूर – कोणावरही व्यक्तीगत हल्ले करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भारताच्या पंतप्रधानांच्या वडिलांचा अनादरपूर्वक उल्लेख करणे हे अयोग्यच आहे. शिवसेनेच्या या उद्योगांना भाजपने उत्तर देण्याचे गरज नाही, जनताच त्यांना काय द्यायचे ते उत्तर देईल, अशा शब्दांत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करताना त्यांच्या वडिलांचाही अवमानकारक उल्लेख करणा-या शिवसेनेवर फडणवीसांनी आज जोरदार टिका केली. भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या फडणवीस यांनी आज नागपुरात मतदान केल्यानंतर ते बोलत होते. तसेच महाराष्ट्रात भाजपचेच सरकार पूर्ण बहुमताने येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.