राजधानीत १० दिवसांत आढळले डेंगीचे आणखीन ३८ रुग्ण

dengue
नवी दिल्ली – दिल्लीमध्ये डेंगीचे ३८ नवीन रुग्ण आढळले आहेत. यावर्षी डेंगीच्या रुग्णांची संख्या १५८ पर्यंत पोहोचले आहे. यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहीतीनुसार दिल्लीत सुरु असलेल्या पावसाने डेंगी रुग्णांच्या संख्येत अजून वाढ होऊ शकते. त्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. सप्टेंबरमध्ये अचानक डेंगीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. फक्त दहा दिवसांत डेंगीचे ३८ नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्ली प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १५८ मधून १४१ रुग्ण हे दिल्लीतील आहेत. यावर्षी सप्टेंबर महिन्यात डेंगीचे ८७ रुग्ण आढळले होते. मात्र मागील दहा दिवसांत ३८ नवीन रुग्ण आढळले आहेत. गतवर्षी दिल्लीमध्ये डेंगीचे एकूण ५५७४ रुग्ण आढळले असून फक्त ऑक्टोबर महिन्यातील डेंगीच्या रुग्णांची संख्या २४४२ इतकी होती. यंदा दिल्ली महापालिकेच्या दक्षिण विभागात सर्वाधिक ६३ रुग्ण, उत्तर विभागात २७ आणि पूर्व भागात २२ रुग्ण आढळले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment