मागील दोन महिन्यात इबोलाचे दहा हजार बळी

ebola
लंडन – हजारो नागरिकांचा जीव घेणा-या इबोला संसर्गाचा धोका जागतिक स्तरावर होईल असा इशारा जागतिक आरोग्य संस्थेने दिला आहे. इबोला संसर्गाने मृत्यू दरात ७० टक्क्याने वाढ झाली आहे. मागील दोनमहिन्यात प्रत्येक आठवड्यात इबोलाचे १०,००० रुग्ण आढळले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेने दिलेल्या माहितीनुसार एक दिवसापूर्वी इबोलाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ४,४४७ इतकी असून यामध्ये सर्वाधिक नागरिक पश्चिम आफ्रीकेत राहात होते. आफ्रिकेत एकूण इबोला रुग्णांची संख्या ८,९१४ इतकी आहे. तर जर्मनीमध्येही इबोलासंसर्गाचे सहा रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. सिरिया लियोन, गिनीया आणि लायबेरिया या देशांना इबोला संसर्गाचा मोठा फटका बसला आहे

या रोगाकडे वेळीच लक्ष दिले नाही जागतिक स्तरावर याचा फार मोठा परिणाम होईल असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संस्थेने (डब्लु.एच.ओ) दिला आहे. पुढच्या ६० दिवसांत इबोला संसर्गाला थांबवण्यासाठी उपयायोजना केल्या नाही तर तो आणखी बळावेल आणि अनेक लोकांचा बळी जाईल असे डब्लु.एच.ओ चे महासंचालक एलवार्ड जेनेवा यांनी सांगितले. तर डब्लु.एच.ओ चे संचालक मार्गारेट चान म्हणाल्या की, जगभरात या रोगाच्या निवारणासाठी उपाययोजनेत गती आणेणे आवश्यक आहे. रोगाची लागण थांबवता यावी म्हणून डब्लु.एच.ओ कार्यरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील अध्यक्ष शॅरोन एकामबरम यांनी सांगितले की, इबोलासंसर्ग रोखण्यासाठी कार्यरत पथकाला ग्लोबल कम्युनिटीकडून पुरेशी मदत मिळाली आहे. मात्र अफ्रीका युनियनकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे सांगत त्यानी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment