
पुणे : पुण्याजवळील श्रीक्षेत्र थेऊर येथे हवाई दलाचे प्रशिक्षण सुखोई विमान आज सायंकाळी दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात सुदैवाने विमानातील दोनही पायलट सुखरूप बचावले. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
श्रीक्षेत्र थेऊरजवळ सुखोई दुर्घटनाग्रस्त
हवाई दलाचे सुखोई विमान आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुण्यापासून आठ किलोमीटर अंतरावर थेऊरजवळील कोलवडीत कोसळले. यावेळी विमानातील दोनही वैमानिकांनी प्रसंगावधान राखत बलूनच्या सहाय्याने विमानातून उडया मारल्याने ते सुखरूप बचावले. दोघेही अष्टापूरजवळ उतरले. दरम्यान, हवाई दलाचे हॅलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले आहे.
