उच्च न्यायालयाने फेटाळली टोलवसुलीविरोधी याचिका

high-court
मुंबई – बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापुरमध्ये टोलविरोधी कृती समितीने आयआरबी कंपनीकडून केल्या जाणा-या टोलवसुली विरोधातची याचिका फेटाळून लावली आहे.

कोल्हापूर शहरात खासगीकरणाच्या माध्यमातून ५२ किलोमीटरचे रस्ते आयडियल रोड बिल्डर (आयआरबी) कंपनीने बांधले आहेत. कंपनीकडून बांधकाम करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असल्यामुळे कंपनीकडून केली जाणारी टोलवसुली ही बेकायदेशीर असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.

या प्रकरणी चंद्रमोहन पाटील व किरण पवार यांनी तर, माजी आमदार पी. एन. पाटील, सुभाष वाणी, शिवाजीराव परुळेकर, अमर नाईक यांनी स्वतंत्रपणे याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने आयआरबी कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment