मून यांनी दिला गांधींच्या विचारांचे अनुकरण करण्याचा सल्ला

ban-ki-moon
संयुक्त राष्ट्रसंघ – संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांनी इराक आणि सिरीयात वाढत असलेल्या हिंसाचाराप्रकरणी महात्मा गांधीच्या विचारांचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यात त्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसा आणि शांती, या संदेशाची आठवण करुन दिली आहे. ‘म्युझिक फॉर पीस’ या कार्यक्रमात मून बोलत होते. ते म्हणाले की, इतिहासातील सर्वात महान विचारवंतांपैकी एक असलेल्या गांधीजींच्या जीवनचरित्राचे अध्ययन करणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहेर नासेर यांनी सांगितले की, आज जातीय हिंसाचार आपल्या मर्यादा ओलांडत आहे. इराक आणि सिरीयात सांस्कृतिक स्थळे नष्ट करण्यात येत आहे. आपल्याला वेळीच गांधीजींच्या संदेशांचे अनुकरण करायला हवे, असे ते म्हणाले.