आता केवळ फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करणार – कार्तिक

dinesh
नवी दिल्ली – भारतीय संघात अनेकदा आत-बाहेर होणारा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला घरच्या टूर्नामेंटमध्ये फलंदाज म्हणून पुनरागमन करायचे आहे. एका अनावरण सोहळ्यात आलेल्या कार्तिकने सांगितले की, जेव्हा महेंद्र सिंह धोनी राष्ट्रीय संघात आहे, तेव्हा एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मी संघात खेळू शकत नाही. त्यासाठी मी केवळ माझ्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करणार आहे. तामिळनाडु येथून रणजी सामने खेळणा-या २९ वर्षीय कार्तिकने सांगितले की, संघात मी तिस-या स्थानावर खेळतो आणि माझी भुमिका संघासाठी जास्तीत जास्त धावा करण्याची असते, असेही तो पुढे म्हणाला.

Leave a Comment