टेनिस स्टार एना इवानोविचने केले मॅगझिनसाठी ग्लॅमरस फोटोशूट

tennis
न्यूयॉर्क – सर्बियाची टेनिस स्टार एना इवानोविचने प्रसिद्ध मॅगझिन ‘बेला’ साठी एक फोटोशूट केले आहे. दुखापतग्रस्त डब्ल्यूटीए जनराली लेडिज लिंज टेनिस स्पर्धेतून माघार घेतलेल्या इवानोविचचे हे फोटोशूट खूपच ग्लॅमरस आहे. एना या टेनिस स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे तिचे चाहते नाराज झाले असले तरी, तिला मॅगझीनच्या कव्हरपेजवर बघून नक्कीच खूष होतील. या शूटने एनाने तिच्या फॅशन सेंसची देखील झलक दाखविली आहे. तर, एना साधारण आणि ग्लॅमरस कपडे देखील शानदार पद्धतीने परिधान करते. एना टेनिससह फॅशन स्टेटमेंटसाठी देखील चर्चेत असते. अमेरिकेचे मॅगझिन ‘बेला’ व्यतिरिक्त ‘एफएचएम’, ‘स्पोर्टस इलस्ट्रेटेड’, ‘एस्क्वायर’ यांसारख्या प्रसिद्ध मॅगझिनसाठी आणि जॉन रूसो सारख्या प्रतिष्ठित छायाचित्रकारासाठी तिने शूट केले आहे. सर्बियाला राहणारी इवानोविच २०१३ मध्ये सर्वाधिक कमार्इ करणा-या अव्वल १० टेनिस खेळाडूंमध्ये सामिल होती. तिने फोर्ब्स मॅगझिनच्या आकड्यांनुसार २०१३ मध्ये एंडोर्समेंट्सकडून ५० कोटींपेक्षा अधिकची कमार्इ केली होती.

Leave a Comment