
नवी दिल्ली – गुगलने आज ‘मालगुडी डेज‘चे रचयिते आर. के. नारायण यांच्या १०८व्या जयंतीनिमित्त खास आकर्षक डुडल त्यांना समर्पित केले आहे.
गुगलचे आर. के. नारायण यांच्यासाठी डुडल
त्यांच्या ‘मालगुडी डेज‘ने चाळीसच्या दशकात मोठी प्रसिद्धी मिळविली होती. गुगलले केलेल्या या डुडलवर पुस्तक घेऊन उभे असलेले मालगुडी डेजचे लेखक आर. के. नारायण असून त्यांचा प्रसिद्ध लेखक असल्याचा अभिमानास्पद उल्लेख करुन १०८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘मालगुडी डेज‘ या कादंबरीवर दुरदर्शनवर मालगुडी डेज नावाची मालिकाही तयार करण्यात आली होती. आर. के. नारायण यांच्या गाइड कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. या कादंबरीवर आधारीत देव आनंद यांची प्रमूख भूमिका असलेला चित्रपटही आला. कला विभागातून पदवी संपादन केलेले नारायण हे इंग्रजीचे शिक्षक होते.
