इशांत शर्माची टीम इंडियात एंट्री

ishant-sharma
मुंबर्इ – वेस्टइंडिज विरूद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला गोलंदाज मोहित शर्माच्या जागी इशांत शर्माला स्थान देण्यात आले आहे. मोहित आता या मालिकेतून बाहेर पडला असून, इशांत या मालिकेत खेळणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, मोहित दुखापतग्रस्त आहे आणि त्यामुळे त्याला वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. निवड समितीने मोहितच्या जागी इशांतला संघाला सामिल केले आहे. इशांतने आपला अखेरचा एकदिवसीय सामना जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरूद्ध खेळला होता. तो बांगलादेश विरूद्ध झालेल्या सामन्यांव्यतिरिक्त आशिया चषक आणि इंग्लंडसोबत झालेल्या एकदिवसीय मालिकेत खेळू शकला नव्हता. वेस्टइंडिज विरूद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या ०-१ ने मागे आहे. कैरेबियन संघाने भारताला पहिल्या सामन्यात १२४ धावांनी मात दिली होती. दुसरा सामना शनिवारी दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानावर होणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत.

Leave a Comment