औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला सुरेश जैन यांचा जामीन अर्ज

suresh-jain
औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाने घरकुल घोटाळयाप्रकरणी तुरूंगात असलेल्या माजी गृहराज्यमंत्री सुरेश जैन यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक त्यांना तुरूंगातूनच लढवावी लागणार आहे.

जळगाव शहर मतदारसंघातून सुरेश जैन हे विधानसभा निवडणूक लढवित असून प्रचारासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे जामीन अर्ज केला होता. त्यावर नुकतीच सुनावणी झाली होती. त्याचा निकाल आज (शुक्रवार) न्या. संभाजी शिंदे आणि न्या. टी. व्ही. नलावडे यांनी दिला. या निर्णयाविरूद्ध जैन वरच्या न्यायालयात दाद मागणार आहेत. मात्र, तेथेही हाच निकाल कायम ठेवण्याचा निर्णय झाल्यास त्यांना यंदाची निवडणूक तुरूंगातूनच लढवावी लागणार आहे.

Leave a Comment