खेड टोलनाक्यावर २१ लाखाची रोकड जप्त

cash
पुणे – निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी निवडणूक आयोग सर्तक असून, रोज राज्याच्या कुठल्या ना कुठल्या भागातून बेहिशोबी रोख रक्कम जप्त करण्यात येत आहे.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार जयसिंग एरंडे यांच्या मुलाच्या गाडीतून बुधवारी रात्री पुणे पोलिसांनी २१ लाखांची रोकड जप्त केली. एरंडे यांचा मुलगा फॉर्च्युनर गाडीने आंबेगावला येत होता. तेव्हा पोलिसांनी खेड टोलनाक्यावर नाकाबंदी लावली होती.

नाकाबंदीमध्ये पोलिसांनी त्याच्या गाडीची तपासणी केली असता पोलिसांना गाडीमध्ये २१ लाखाची रोकड सापडली. पोलिसांनी रोकड आणि कार आपल्या ताब्यात घेतली आहे. निवडणूक काळात रोख रक्कम जवळ बाळगण्यासंदर्भात काही नियम आहेत.

ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम तुमच्याकडे असेल तर, त्याचा कागदोपत्री पुराव जवळ असणे आवश्यक आहे. दरम्यान पोलिस ही रक्कम कुठून आली, कुठे नेण्यात येत होती. त्याचा काय वापर होणार होता याची एरंडे यांच्या मुलाकडे चौकशी करत आहेत.