इबोलाने घेतला पहिल्या अमेरिकन नागरिकाचा बळी

ebola
डलास – प्राणघातक इबोला रोगामुळे संक्रमित अमेरिकन नागरिकाचा टेक्सोस रूग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगभरात आतापर्यंत इबोला रोगाच्या संक्रमणाचे सुमारे ३४०० पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. टेक्सोस रूग्णालयातील प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, थॉमस एरिक डक्कन नावाच्या या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. थॉमस सुमारे २० दिवसाआधी आफ्रिकेतील इबोला प्रभावित देश लाइबेरिया येथून परतला होता. त्यामुळे तो अमेरिकेत दाखल झाल्यावर आजारी पडल्यामुळे २८ सप्टेंबर रोजी डक्कन याला रूग्णांलयामध्ये दाखल करण्यात आले. डक्कनला रूग्णालयात दाखल केल्यावर इबोला रोगाचे संक्रमण झाल्याचे निष्पन झाले. दरम्यान त्याच्या संपर्कात आलेल्या ४८ लोकांना देखीलकडक निरीक्षणामध्ये ठेवले आहे. परंतू त्यांच्या पैकी कोणीही इबोला संक्रमित आढळले नाही.

Leave a Comment