मुंबईत तापाचे १२,१७७ आणि मलेरियाचे १३९६ रूग्ण !

mumbai
मुंबई – मुंबईमध्ये १ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या दरम्यान तापाच्या १२,१७७ आणि मलेरियाच्या १३९६ रूग्णांची नोंद झाली आहे. चिकनगुणीयाच्या एका रूग्णांचीही ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात नोंद झाली आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०१४ या कालावधीत पालिकेच्या विविध रूग्णांलयात तापाचे सर्वाधिक १२.१७७, मलेरियाचे १३९६, गॅस्ट्रोचे ८३०, डेंग्यूचे २०८, टायफॉईड १९३, काविळ १४२, लेप्टो २२, कॉलरा ५, चिकनगुणीयाचा १ अशा १४,९७४ रूग्णांची नोंद झाली आहे.

Leave a Comment