
मुंबई – घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राम कदम यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे.
भाजप उमेदवार राम कदम यांच्या विरोधात एफआयआर
घाटकोपर पोलिस स्थानकात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कदम यांच्यावर फसवणूकीचा आरोप करत त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला असून घाटकोपर पश्चिमेला असल्फा विलेजमध्ये गणपती मंदिराजवळच्या मोकळया जागेत राम कदम यांनी निवडणूक प्रचारासाठी कार्यालय थाटले होते.
या कार्यालयात त्यांनी लाऊडस्पीकर लावून निवडणूक प्रचार केला. काही जणांनी याची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाच्या तपासामध्ये या आरोपात तथ्य आढळून आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशावरुन घाटकोपर पोलिसांनी कदम यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
