आजपासून ‘आयफोन ६’ची अधिकृत बुकिंग

iphone
नवी दिल्ली – अ‍ॅपलने ‘आयफोन ६’ आणि ‘ऑयफोन ६ प्लस’ या दोन्ही फोनच्या भारतातील अधिकृत किमतीची घोषणा केली असून ५३,५०० रुपये ते ८०,५०० रुपयांच्या रेंजमध्ये भारतीयांना उपलब्ध करण्यात आले असून इनग्राम मायक्रो या अ‍ॅपलच्या अधिकृत विक्रेत्याकडून या दोन्ही फोनसाठी वेबसाइटसह २४ शहरांमधील १२०० रिटेल आउटलेटमधून मंगळवारपासून बुकिंग सुरू होत असून सर्व मॉडेलची १७ ऑक्टोबरपासून विक्री सुरू केली जाईल.

अ‍ॅपलचे भारतातील अधिकृत वितरक रेडिंग्टन, इनग्राम मायक्रो, राशी पेरिफेरल आणि रिलायन्स हे आहेत. ‘आयफोन ६’ हा फोन ५३,५०० रुपये ते ७१,५०० रुपयांमध्ये, तर ‘आयफोन ६ प्लस’ हा फोन ६२,५०० ते ८०,५०० रुपयांमध्ये भारतात उपलब्ध करण्याचा निर्णय अ‍ॅपलने घेतल्याचे या विक्रेत्यांनी म्हटले आहे. अ‍ॅपलने अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच ई-कॉमर्स साइटवरील विक्रेत्यांनी या फोनची विक्री सुरू केली आहे. ई-कॉमर्सवरील ५६,००० रुपये किमतीपेक्षा अधिकृत किंमत खूपच कमी आहे. दरम्यान, अमेरिकेतील किमतीपेक्षा आयफोनची नवी मालिका भारतामध्ये १० ते १७ टक्क्यांनी महाग आहे. अ‍ॅमेझॉनकडून अमेरिकेत आयफोन शिपिंग खर्चासह ७५० डॉलर म्हणजेच साधारण ४६,००० रुपयांमध्ये विकला जात आहे.

Leave a Comment