इंटेक्सचा स्वस्त स्मार्टफोन लॉंच, किंमत फक्त ४,३३३ रुपये !

intex
मुंबई – भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनची चांगलीच चलती आहे. त्यातही आता स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्यात येत आहे. असाच एक स्वस्त स्मार्टफोन इंटेक्सने लाँच केला आहे. इंटेक्स अॅक्वा वाय २ प्रो स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. ४,३३३ रुपयांना हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. इंटेक्स अॅक्वा वाय २ प्रो स्मार्टफोनमध्ये ड्यूएल-सिम सपोर्ट, ४८०x८५४ पिक्सल रिझोल्यूशन ४.५ इंच डिस्प्ले, १ गीगीहर्टझ ड्यूएल-कोअर मिडियाटेक प्रोसेसर आणि ५१२ एमबी रॅम, ५ मेगापिक्सल एलईडी फ्लॅश कॅमेरा, ०.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, अँड्राँईड ४.२ सिस्टिमवर आधारित, ४ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ३२ जीबी पर्यंत मायक्रो-एसडी कार्ड क्षमता, १६०० एमएएच बॅटरी क्षमता, ३जी, वाय-फाय, ब्ल्यूटूथ अशी वैशिष्ट्ये आहेत.