केंद्र सरकारचे जॉब पोर्टल सुरू होणार

jobs
दिल्ली -नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी केंद्र सरकारने नॅशनल करियर सर्व्हीस जॉब पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या पोर्टलाचा पहिला टप्पा या वर्षअखेर कार्यान्वित केला जाणार असल्याचे श्रम मंत्रालयातील अधिकार्‍यांकडून समजते.

या पोर्टलची निर्मिती एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे त्याचाच एक भाग आहे. यामुळे नोकरीच्या संधी कुठे आहेत तसेच प्लेसमेंट स्कील प्रशिक्षण संधी कुठे उपलब्ध आहेत याची नियमित माहिती गरजूंना मिळू शकणार आहे. ब्रिटनमध्ये अशी सेवा दिली जाते. या पोर्टलच्या सहाय्याने नोकरी हवी असणार्‍यांना सरकारी, खासगी, सार्वजनिक क्षेत्रात कुठे नोकर्‍या आहेत याची माहिती मिळेलच पण स्टफिंग एजन्सी, स्किलींग इन्स्टिट्यूट, ट्रेनर यांनाही या पोर्टलचा उपयोग होऊ शकणार आहे. नोकरी हवी असणार्‍यांना त्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. उमेदवाराची ओळख पटविणे नोंदणी केल्यामुळे सहज शक्य होणार आहे.