तब्येत बरी नाही- सिक सेल्फी पाठवा

selfie
तब्येत बरी नसताना ऑफिसला जाऊ नये असे वाटणे सहाजिक आहे. मात्र तब्येत बरी नसल्याचे कारण देऊन दांड्या मारणार्‍या नोकरवर्गाचे प्रमाण प्रचंड असल्याने हे कारण देऊन रजा घेतली तर ते खरे वाटत नाही. अशावेळी स्मार्टफोन आपल्या मदतीला येऊ शकतो. तो केवळ आपण खरेच आजारी असल्याचे बॉसपर्यंत पोहोचवून थांबत नाही तर आपल्या मित्रवर्गाची सहानुभूतीही मिळवितो. ट्वीटरवरील हॅश टॅग सिक सेल्फीबाबत केल्या गेलेल्या संशोधनातून ही बाब सिद्ध झाली आहे.

आजारी पणाचे नुसते कारण न देता खरेच आजारी असल्याची सेल्फी बॉसला पाठविण्याचा ट्रेंड वाढत चालला असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यासाठी कॅमेर्‍यासह स्मार्टफोन असलेल्या २३०० नोकरदारांची मते विचारात घेण्यात आली. वाऊचरक्लाऊड या संस्थेने हे सर्वेक्षण केले तेव्हा ५० टक्के लोकांनी आपण आजारी असल्यास सिक सेल्फी पाठवितो असे मान्य केले. १९ टक्के नोकरदारांनी सिक सेल्फी पाठविण्यास संमती दर्शविली तर १५ टक्के नोकरदारांनी या मुळे सहकारी कर्मचार्‍यांची सहानुभूती मिळते हे मान्य केले.

Leave a Comment