
मुंबई – लोकसभा आणि उत्तरप्रदेश निवडणूकीनंतर काहिसे बॅकफूटवर गेलेले कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधींचे अखेर महाराष्ट्रातील रणधुमाळीत आगमन होत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने खुलासा केला आहे की, काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी दोन सभा घेणार आहेत. उद्या ८ तारखेला राहुल यांची पहिली सभा कोकणातील महाड येथे घेणार आहेत. राहुल गांधी महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात किमान एक सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, सध्या तरी त्यांच्या दोनच सभा निश्चित झालेल्या आहेत. ८ ऑक्टोबरला राहुल हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यात दुपारी महाड तर त्यानंतर लातूर जिल्ह्यातील औसा येथे ते एक सभा घेणार आहेत.
