निवडणुकीचे अचूक निकाल द्या, २१ लाख जिंका! अंनिसचे ज्योतिषांना आवाहन

vidhansabha
नाशिक – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांचा फोलपणा सातत्याने मांडत आलेली आहे. फल ज्योतिशास्त्र आहे, असा दावा करणाऱ्या मंडळींना समितीतर्फ नेहमीच आवाहन दिले गेले आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणुकीत कोणाला विजयी पताका फडकणार, कोणत्या पक्षाची सरशी असेल, बहुमत कोणाला मिळेल, यांचे अचूक निकाल द्या आणि २१ लाख रुपये जिंका, असे आवाहन अंधश्रध्दा न‌िर्मूलन सम‌ितीने ज्योत‌िषांना द‌िले आहे. सन २००८ आण‌ि २०१४ मध्येही राष्ट्रीय स्तरावर झालेल्या न‌िवडणुकांसदर्भात महाराष्ट्र अंन‌िस, आयुका आण‌ि पुणे व‌िद्यापीठ यांच्यावतीने ज्योतिषांना आवाहन देण्यात आले होते.

यंदाच्या व‌िधानसभा न‌िवडणुकीत व‌िव‌िध पक्षांना म‌िळणाऱ्या जागा, न‌िवडून येणाऱ्या उमेदवारांच्या मतांची टक्केवारी, महत्वाच्या मतदारसंघातील व‌िजयी उमेदवार, नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांची नावे या व‌िषयीचे भव‌िष्य वर्तव‌िले जावे, असे मुद्दे या प्रक्रियेत अपेक्ष‌ित आहेत. सीलबंद प्रवेशिका नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर आठवडाभराच्या आत परीक्षक सम‌ितीसमोर उघडली जाणार आहेत. यानंतर न‌िकाल जाहीर करण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत‌िज्ञापत्र, पाच हजार रुपयांचा धनादेश ‘अंधश्रध्दा न‌िर्मूलन सम‌िती, सातारा, महाराष्ट्र’ या नावाने १५ ऑक्टोबरपर्यंत पाठवा. यासाठी प्रवेश‌िका पाठव‌िण्याची अंतिम तारीख १८ ऑक्टोबरपर्यंत आहे. या प्रवेश‌िका http://antisuperstition.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अध‌िक माह‌ितीसाठी डॉ.न‌ितीन श‌िंदे, ‘कल्पतरू’ कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजसमोर, इस्लामपूर ता. वळवा (ज‌ि.सांगली) मोबाईल : ९८६०४३८२०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अंन‌िसच्या वतीने अव‌िनाश पाटील, डॉ. न‌ितीन श‌िंदे, प्रकाश घाटपांडे, कृष्णा चांदगुडे, डॉ. ठकसेन गोराणे आदींनी केले आहे.

Leave a Comment