रेनाँची इलोब कन्सेप्ट कार

reno
फ्रान्सच्या रेनाँ या वाहन उत्पादन कंपनीने १ लिटरमध्ये १०० किमी जाऊ शकणारी कन्सेप्ट कार डिझाईन केली असून ती २०१४ मध्ये पॅरिसमध्ये भरलेल्या मोटर शो मध्ये सादर करण्यात आली होती. या कारचे नामकरण इलोब असे केले गेले आहे मात्र कंपनी ही कार प्रत्यक्षात बाजारात आणणार वा नाही या संबंधी कांहीही जाहीर केले गेलेले नाही. फोक्सवॅगननेही अशीच १ लिटर मध्ये १०० किमी जाणारी कार यापूर्वीच सादर केली आहे.

रेनाँतील वरीष्ठांकडून दिल्या गेलेल्या माहितीप्रमाणे ही हायब्रीड कार असून त्याचे प्रॉडक्शन मॉडेल लवकरच सादर केले जाणार आहे. ही कार १ लिटरमध्ये १०० किमी जाऊ शकते शिवाय १ लिटरमध्ये ती फक्त २२ ग्रॅम कार्बन डाय ऑक्साईड बाहेर टाकते म्हणजेच ती प्रदूषण कमी करते. तिचे वजन कमी आहे व टॉप स्पीड आहे ११८.४ किमी प्रति तास. इलोबचे छत मॅग्नेशियमपासून तर दारे अॅल्युमिनियमपासून तयार केली गेली आहेत. गाडीचे बॉनेट थर्मोप्लास्टीक पासून बनविले गेले आहे. कंपनी कदाचित त्यांच्या भविष्यातील कार साठी हे तंत्रज्ञान वापरू शकेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment