आयफोन ६ व ६ प्लसच्या नोंदणीला ७ ऑक्टोबरपासून सुरुवात

iphone
मुंबई – भारतातील आयफोनप्रेमी ज्या आयफोनची आतुरतेने वाट पाहत होती तो आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस लवकरच भारतात दाखल होणार असल्याचे ऍपल इंडियाने आज जाहीर केले. आयफोन ६ या स्मार्टफोनची पूर्वनोंदणीला सात ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असल्याचे ऍपलतर्फे सांगण्यात आले आहे. तर १७ ऑक्टोबरपासून आयफोन ६ आणि ६ प्लस भारतात अॅपलच्या अधिकृत विक्री केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. कंपनीने अद्याप या आय़फोन्सच्या किंमतींचा खुलासा केलेला नसला तरी या फोनची किंमत ५५,००० ते ८५,००० रुपयांच्या दरम्यान असेल असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment