जापानमध्ये मुसळधार पावसाने लाखो लोक प्रभावित !

rain
टोकियो – जपानमध्ये मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. दरम्यान अनेक विमाने रद्द करण्यात आले आहे. जोरदार वादळवा-याने ओकिनाया बेटावर कालपासूनच उंच उंच लाटा उफाळत होत्या. यामध्ये अमेरिकेतील तीन नागरिक वाहून गेले आहेत. एका नागरिकाचा मृतदेह आढला असून इतर दोन जण बेपत्ता आहेत. हमामात्सु आणि सुतुका शहरात आज सकाळपासूनच वादळी वारा आणि जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तेथील औद्योगिक कंपन्यांनी आपले काम बंद केले आहे. जापानच्या पुर्वेमध्ये जोरदार पावसामुळे नद्यांत उंच लाटा उफाळत आहेत. त्यामुळे जपानमध्ये माहापुराचे संकट निर्माण झाले आहे.

Leave a Comment