युरोपातही ऑक्टोबर अखेरपर्यंत इबोलाचा प्रसार ?

ebola
लंडन – पश्चिम आफ्रिकेत थैमान घालणारा इबोला हा रोग ऑक्टोबर अखेरपर्यंत फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये पसरण्याची शक्यता असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. फ्रान्समध्ये हा रोग पसरण्याची ७५ टक्के आणि ब्रिटनमध्ये हा रोग पसरण्याची ५० टक्के शक्यता असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. फ्रान्सला या रोगाचा सर्वाधिक फटका बसू शकतो कारण गिनीया, लिबेरिया, सिएरा लियोन या देशांमध्ये फ्रेंच नागरिक सर्वाधिक असून, ते परतीच्या मार्गावर आहेत. फ्रान्स आणि ब्रिटनने आत्तापर्यंत आपआपल्या देशाच्या इबोलाची लागण झालेल्या एका व्यक्तीवर यशस्वी उपचार केले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, ब्रिटनमध्ये दाखल होणार्या अनेकांना तर आपल्याला इबोलाची लागण झाली असल्याचे माहित देखील नसते. ब्रिटनच्या लानकास्टर विद्यापीठाचे डेरेक गॅथरर यांनी म्हटले की, पश्चिम आफ्रिकेतील इबोलाची परिस्थिती जर अधिकच चिघळली तर अनेक नागरिक उपचाराकरिता युरोपात दाखल होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment