पृथ्वीबाबांचा ‘काटा’ काढण्यासाठी उंडाळकरांसोबत राष्ट्रवादी

cm
पुणे – राष्ट्रवादीने दक्षिण कराड मतदारसंघातून विदयमान आमदार विलासकाका उंडाळकर यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांना पाठिंबा जाहीर केला असून काँग्रेसने उंडाळकर यांच्याऐवजी पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी दिल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केलेले राजेंद्र यादव यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या गोटात प्रवेश करीत आज अखेरच्या दिवशी अर्ज माघारी घेतला. यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीने विलासकाका उंडाळकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे.

पृथ्वीराज चव्हाणांना दक्षिण कराडमध्येच अडकवून ठेवायचे, पराभूत करण्यासाठी सर्व डावपेच आखायचे व राज्याचे मैदान मारायचे अशी रणनिती राष्ट्रवादीने ठरविल्याचे बोलले जात आहे. पृथ्वीराज चव्हाणांना आता उंडाळकर यांच्यासह भाजपचे अतुल भोसले व शिवसेनेचे अजिंक्य पाटील यांचे आव्हान असेल.