केवायसी न देणार्‍या ग्राहकांची बँक खाती जप्त होणार

rajan
पंतप्रधानांनी सुरू केलेली जनधन योजना यशस्वी व्हावी यासाठी केवायसी म्हणजे नो युवर क्लायंट साठीचे नियम सुलभ केले गेले असले तरी जे ग्राहक हे नियम पाळणार नाहीत त्यांची खाती जप्त करण्याचे अधिकार बँकांना दिले गेले असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले आहे.

राजन म्हणाले की बँक खाते उघडताना केवायसी द्यावे लागते व त्यासाठी ग्राहकांना अनेक अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन केवायसी साठीचे नियम पुष्कळ सुलभ केले गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या बर्‍याच अडचणी दूर झाल्या आहेत. मात्र तरीही जे ग्राहक केवायसी देणार नाहीत त्यांचे खाते जप्त करण्याचे अधिकार बँकांना दिले गेले आहेत. सुरवातील ग्राहकांना त्यासंदर्भात इशारा दिला जाईल, नंतर त्यांना बँकेत पैसे भरण्याची सुविधा राहिल मात्र पैसे काढता येणार नाहीत. आणि त्यानंतही नियमांची पूर्ती केली गेली नाही तर खाते रद्द केले जाईल.

नव्या नियमांनुसार सर्वसामान्य ग्राहकांना कागदपत्रे देण्यासाठी बँकेत येण्याची गरज नाही. ते आपली कागदपत्रे मेल अथवा फंक्सनेही पाठवू शकतात. तसेच त्यांना मोबाईल बँकींगची सुविधाही दिली गेली आहे.

Leave a Comment