उद्या मरे, परेचा मेगाब्लॉक

mega-block
मुंबई – उद्या अचानक मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घोषित केल्यामुळे उद्या गांधी जयंतीची सुटी असल्याने बाहेर फिरायला तसेच खरेदीसाठी जाण्याचा बेत आखणाऱ्या मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

उद्या(दि.२) मध्य रेल्वेच्या भायखळा ते विद्याविहार डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.२० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला डाऊन आणि वडाळा रोड ते वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत वांद्रे, अंधेरी येथे जाण्यासाठी त्याच तिकीट आणि पासावर मुख्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आह.

या मेगाब्लॉकमुळे २ ऑक्टोबरच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार आहेत. तसेच ३ तारखेला दसरा असल्याने गुरुवारी मुंबईकर खरेदीसाठी बाहेर पडणार त्यामुळे त्यांना मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे.