४ ऑक्टोबरपासून राज्यात धडाडणार मोदींची तोफ

modi1
मुंबई : ४ ऑक्टोबरपासून राज्यात विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार आहे. पंतप्रधानांच्या सभांचा धडाका पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन तेथूनच सुरु होण्याची शक्यता आहे.

पहिल्याच दिवशी कोल्हापूरसह राज्यात चार ठिकाणी पंतप्रधान मोदी प्रचारसभा घेण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे आणि बीड जिल्हय़ातील भाजपा उमेदवारासाठी बीडमध्येही मोदी यांची सभा होणार आहे. तसेच मुंबईमध्येही त्यांची सभा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजपाच्या प्रचाराला सुरुवात झाली असली तरी प्रचारला खरा वेग हा मोदी यांच्या सभांदरम्यान येणार आहे. राज्यात तीन जिल्हय़ासाठी एक सभा असे नियोजन करण्यात आले असून, मोदी यांच्या एकूण 25 सभा होण्याची शक्यता आहे.