आजपासून मुंबई प्रवेश महागणार

tollnaka
मुंबई – आजपासून अधिक टोलचा भुर्दंड मुंबईतील वाहनचालकांना सोसावा लागणार असून शहरातील पाच टोलनाक्याचे दर वाढण्यात आले आहेत. याची आकारणी सुरूही करण्यात आल्यामुळे मासिक पासच्या दरातही वाढ होणार आहे.

आजपासून ऐरोली टोलनाका, वाशी टोलनाका, मुलुंड चेकनाका, मुलुंड जकात नाका, आणि दहिसर टोलनाक्यावरील दर वाढवण्यात आले आहेत. मुंबईच्या या पाचही टोलनाक्यांवर ५ ते २० रूपयांची दरवाढ करण्यात आली आहे.

या टोलवाढीमुळे चारचाकी वाहनांसाठी ३० रुपयांऐवजी आता ३५ रुपये दर आकारला जाईल. मिनी बस आणि तत्सम वाहनांना ४५ रुपये द्यावे लागणार आहेत. ट्रक आणि बससाठी ९० रुपये देऊन मगच मुंबईत प्रवेश करता येणार आहे. तर अवजड वाहनांना मुंबईतील प्रवेशासाठी ११५ रुपये मोजावे लागणार आहेत.

या टोलवाढीमुळे दररोज मुंबईत ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. मात्र या वाढीव टोलदरांबाबत मुंबईकरांमध्ये संभ्रम असल्याचे दिसत आहे. वाशी, मुलुंडसह पाचही टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत.

Leave a Comment