राष्ट्रवादीचा प्रचार करणार मातंग समाज

ncp
मुंबई – वर्षभरापासून मातंग समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून आंदोलनास बसलेला अखिल भारतीय मातंग संघ राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहे, असे या संघटनेचे बाबासाहेब गोपले यांनी जाहीर केले.

मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसोबत बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि नवाब मलिक यांनी मातंग समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. राज्यामध्ये जवळपास ८ टक्के असलेल्या मातंग समाजाच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीला निवडणुकीत फायदा होणार असल्याचे गोपले यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून आंदोलनास बसलेल्या बाबासाहेब गोपले यांच्यावर राष्ट्रवादीचे लक्ष गेले नाही. निवडणुकीला काही दिवस असतानाच राष्ट्रवादीने मातंग समाजाच्या नेत्यांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले.