महाराष्ट्रात मोदींचा झंझावाती प्रचार दौरा

narendra-modi
मुंबई – शिवसेनेबरोबरची युती तुटल्यानंतर महायुतीतील अन्य तीन पक्षांसोबत विधानसभा रिंगणात उतरलेल्या भाजपसाठी पंतप्रधान नरेंद मोदी झंझावाती प्रचार दौरा करणार असल्याचे वृत्त आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निवडणूक प्रचार तयारी संदर्भातील माहिती घेतली आहे आणि पंतप्रधान महाराष्ट्रात किमान १५ प्रचार सभा घेतील असे सांगितले असल्याचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सेनेच्या संगतीशिवाय भाजपची निवडणूक लढविण्याची वीस वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. सर्व मतदारसंघात उमेदवारांचा शोध घेण्यापासून भाजपला तयारी करावी लागली आहे. घाईघाईने उमेदवार ठरविल्यामुळे अनेक आयारामांना तिकीटे दिली गेली आहेत. त्याबद्दल पक्षात कांही जण नाराजही आहेत. त्यामुळे भाजपला मोदींची जादू महाराष्ट्रात पुन्हा एकदा दिसावी अशी इच्छा आहे. भाजपसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम पार्टी आणि रिपब्लीकन पक्ष निवडणूक लढवित आहेत.

Leave a Comment