चेल्सी क्लिंटन यांना कन्यारत्न

chelsa
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि माजी परराष्ट्रमंत्री हिलरी यांची एकुलती एक कन्या चेल्सी हिने कन्यारत्नाला जन्म दिला आहे. ३४ वर्षीय चेल्सीने ही बातमी फेसबुकवरून देताना देवाच्या या देणगीबद्दल ती आणि पती मार्क अतिशय कृतज्ञ असल्याचे म्हटले आहे. तर हिलरी आणि बिल यांनी ट्वीटरवरून आपल्या नातीच्या जन्माची खबर दिली आहे. चेल्सी बिल क्लिंटन फौंडेशनच्या कामातही सहभागी आहे.

चेल्सीचे पती मार्क हे गुंतवणूक बँकर आहेत तर चेल्सी २०११ पासून एनबीसीची विशेष संवाददाता म्हणून नोकरी करत होती. तिला या कामासाठी ६ लाख डॉलर्स वार्षिक पगार दिला जात होता व त्यासंदर्भात अमेरिकन जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. गर्भवती राहिल्यानंतर चेल्सीने ही नोकरी सोडली आहे. चेल्सीचे वडील बिल यांनी १९९३ ते २००१ या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषविले आहे तर आई हिलरी २०१६ च्या अध्यक्षपद निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे पहिल्या महिला राष्ट्रपतीपदाच्या दावेदार असल्याचे मानले जात आहे.

Leave a Comment