मोदी सुरक्षाकडे तोडून समर्थकामध्ये पोहचले

modi1
न्यूयॉर्क – भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कच्या विमानतळावरुन हॉटेलला जाताना शेकडो समर्थकांच्या गर्दीमध्ये घुसल्यामुळे त्यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांच्या अडचणी वाढल्या. मोदीच्या गाड्यांचा ताफा हॉटेला पोहचे पर्यंत शकडो लोक हॉटेलच्या बाहेर एकत्र जमा झाले होते आणि त्यांचे अभिनंदन केले.

अनेक लोक हातामध्ये मोदींच्या समर्थनामध्ये लिहिल्या पाट्या घेऊन मोदी – मोदी अशा घोषणा देत होते. या पाट्यांवर वेगवेगळे संदेश लिहिले होते. या दरम्यान मोदी सुरक्षा कवच तोडून समर्थकांमध्ये पोहचले. आपल्या कारमधून उतराच मोदी लोकांमध्ये मिसळले, हे अशा उच्च सुरक्षा असलेल्या शहरामध्ये कोणत्याही व्हीआयपीचा बिल्कुल वेगळाच व्यवहार आहे.

मोदीनी सुरक्षा कडे तोडल्याने न्यूयॉर्कमधील सुरक्षा कर्मचारी आश्‍चर्यचकित झाले. संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये होणार्‍या बैठकीसाठी 140 पेक्षा अधिक देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि शाही लोक एकत्र आले आहेत.

मॅनहटन ते संयुक्त राष्ट्राची इमारती दरम्यानच्या दरम्यानच्या रस्त्याला घेरले आहे आणि वाहतुकही मर्यादीत केली आहे.

संयुक्त राष्ट्राची इमारतीच्या मागे तटरक्षक नौकांनी इस्ट रिव्हरमध्ये आपले स्थान घेतले आहे. तर पोलिसांचे हेलिकॉप्टरही नजर ठेवून आहेत.

मेडिसन एवेन्यूमध्ये न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलकडे जाणारी सर्व रस्ते बंद करण्यात आली आहेत. या ठिकाणी मोदी थांबले आहेत.