
लातूर : विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी उमेदवार बदलून काँग्रेसचे तिकीट देण्यात आले असून आता लातूर शहरमधून अमित तर ग्रामीणमधून धीरज असे भाऊ-भाऊ लढणार आहेत.
धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून लढणार निवडणूक
लातूर ग्रामीणमधून त्र्यंबक भिसे यांना काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी दिली गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आज अचानक धीरज यांचे नाव पूढे करण्यात आले. धीरज यांचे नाव पुढे करण्यात आल्याने समिकरणे बदलल्याचे चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे. वडीलांप्रमाणे धीरज यांचाही जनसंपर्क चांगला आहे. युवकांमध्येही धीरज यांची क्रेझ असल्याने त्यांचा विजय सुकर असल्याचे दिसते.
