मतप्रवाह काय आहेत ?

voters
विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वहात आहेत. उमेदवार आणि त्यांचे पक्ष यांचा इतका गोंधळ झाला आहे की, सामान्य माणसाला आपल्या मतदारसंघात नेमके कोणत्या कोणत्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत याचाही अंदाज येत नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपासून १५ दिवसांत मतदानही होणार आहे. नेमके काय होईल याचे काही निदान करता येत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व मोदी लाटेने सार्‍यांना धुतले. आता ती लाट शिल्लक नाही असा विश्‍वास कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे पण, ती लाट अजून शिल्लक असेल तर या विधानसभा निवडणुकीचे निकाल नेमके कसे लागतील याचा एक आढावा घेण्यात आला आहे.

लोकसभेच्या ४८ पैकी ४२ जागा भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला मिळाल्या आहेत. त्या मतदानाचे तपशील घेण्यात आले असून त्या त्या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रांत कसे मतदान झाले आहे याचे आकडे देण्यात आले आहेत. त्याच रितीने मतदान झाल्यास विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाची धुलाई होणार हे नक्की आहे.

उत्तर महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागात नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर आणि जळगाव हे जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यात विधानसभेचे ४७ मतदारसंघ येतात. त्यातले आता कॉंग्रेसकडे ९, राष्ट्रवादीकडे १३, भाजपाकडे पाच, शिवसेनेकडे ११ आणि इतरांकडे ९ मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३२ मतदारसंघात तर शिवसेनेला १० मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. याच रीतीने मतदान झाले तर या ४७ पैकी २ मतदारसंघ कॉंग्रेसला आणि तीन मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळतील.

मराठवाडा भागात औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली हे जिल्हे येतात. या आठ जिल्ह्यात विधानसभेचे ४७ मतदारसंघ येतात. त्यातले आता कॉंग्रेसकडे १९, राष्ट्रवादीकडे ११, भाजपाकडे तीन, शिवसेनेकडे सात आणि इतरांकडे ७ मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला १७ मतदारसंघात तर शिवसेनेला २० मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. याच रीतीने मतदान झाले तर या ४७ पैकी ९ मतदारसंघ कॉंग्रेसला आणि १ मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळतील.

विदर्भात नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, बुलडाणा आणि गडचिरोली हे ११ जिल्हे येतात. या ११ जिल्ह्यात विधानसभेचे ६२ मतदारसंघ येतात. त्यातले आता कॉंग्रेसकडे २४, राष्ट्रवादीकडे ४, भाजपाकडे १९, शिवसेनेकडे ८ आणि इतरांकडे ७ मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३६ मतदारसंघात तर शिवसेनेला २३ मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. याच रीतीने मतदान झाले तर या ६२ पैकी १ मतदारसंघ कॉंग्रेसला आणि दोन मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळतील.

पश्‍चिम महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर हे जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यात विधानसभेचे ५८ मतदारसंघ येतात. त्यातले आता कॉंग्रेसकडे ११, राष्ट्रवादीकडे २०, भाजपाकडे १०, शिवसेनेकडे ६ आणि इतरांकडे ११ मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला १७ मतदारसंघात तर शिवसेनेला १२ मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. याच रीतीने मतदान झाले तर या ५८ पैकी ० मतदारसंघ कॉंग्रेसला आणि १५ मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळतील.

कोकणात रत्नागिरी, पालगड, ठाणें, सिंधुदुर्ग आणि रायगड हे जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यात विधानसभेचे ३८ मतदारसंघ येतात. त्यातले आता कॉंग्रेसकडे ३, राष्ट्रवादीकडे १०, भाजपाकडे १०, शिवसेनेकडे ५ आणि इतरांकडे १० मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला १० मतदारसंघात तर शिवसेनेला २१ मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. याच रीतीने मतदान झाले तर या ३८ पैकी २ मतदारसंघ कॉंग्रेसला आणि पाच मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळतील.

मुंबईत विधानसभेचे ३६ मतदारसंघ येतात. त्यातले आता कॉंग्रेसकडे १७, राष्ट्रवादीकडे ३ , भाजपाकडे ५, शिवसेनेकडे ४ आणि इतरांकडे ७ मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला १७ मतदारसंघात तर शिवसेनेला १६ मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. याच रीतीने मतदान झाले तर या ३६ पैकी २ मतदारसंघ कॉंग्रेसला आणि १ मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळेल.

Leave a Comment