काँग्रेसचे प्रशांत ठाकूर करणार भाजपात प्रवेश

prashant-thakur
मुंबई – पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आज भारतीय जनता पक्षात भाजप नेते नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टोलप्रश्नी दिलेले आश्वासन त्यांनी पाळले नसल्यामुळे नाराज झालेल्या ठाकूर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका काँग्रेसला बसणार आहे.

खारघर टोल नाका हा केवळ बहाणा असून पनवेल भागातील प्रकल्पांचे कंत्राट मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर भाजपमध्ये दाखल झाल्याची टीका शेकापने केली आहे. प्रशांत ठाकूर यांना पनवेलमधील रहिवाशांच्या समस्यांचे काही पडले नसल्याचा टोलाही शेकापने लगावला आहे.