
मुंबई – मुंबईत प्रवेश करणाऱ्या मार्गांवर उभारण्यात आलेल्या टोल नाक्यांवरील दरात वाढ करण्यात आली असून १ ऑक्टोबरपासून ऐरोली टोलनाका, वाशी टोलनाका, मुलुंड चेकनाका, मुलुंड जकात नाका, आणि दहिसर टोलनाक्यावरील दर वाढण्यात येणार आहेत.
१ ऑक्टोबरपासून टोल दरात वाढ
चारचाकी वाहनासाठी ३० रुपयांऐवजी आता ३५ रुपये दर आकारला जाईल. मिनी बस आणि तत्सम वाहनांना ४५ रुपये द्यावे लागणार आहेत. ट्रक आणि बससाठी ९० रुपये देऊन मगच मुंबईत प्रवेश करता येइल तर अवजड वाहनांना ११५ रुपये असा नवीन दर राहणार असल्यामुळे आता रोज मुंबईत ये-जा करणाऱ्यांवर टोलदराचा मोठा फटका बसणार आहे.
